तुरुंगाबाहेर येताच खासदार संजय राऊतांच्या स्वागतार्थ शिवसैनिकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. राऊतांनी सिद्धिविनायक मंदिरात जात बाप्पांचे दर्शन घेतले. त्यानंतर राऊतांनी शिवतीर्थावर जावून बाळासाहेबांना अभिवादन केले. यांनतर कार्यकर्त्यांनी बोलताना राऊत भावुक झाले. दरम्यान महाराष्ट्रात परत शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, अशी घोषणा देखील केली.